वणीत बिअर बारच्या आड सुरू ‘जुगाराचा अड्डा’? लाखोंची उलाढाल, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जुगार सुरू असल्याचा दावा; धाड पडल्याची चर्चा, मात्र कारवाईबाबत अद्याप मौन

वणीत बिअर बारच्या आड सुरू ‘जुगाराचा अड्डा’? लाखोंची उलाढाल, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जुगार सुरू असल्याचा दावा; धाड पडल्याची चर्चा, मात्र कारवाईबाबत अद्याप मौन
वणी | प्रतिनिधी
वणी शहरातील एका बिअर बारमध्ये खुलेआम जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गंभीर चर्चा शहरात रंगली असून, या ठिकाणी दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा दावा स्थानिक सूत्रांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तीदेखील या जुगार अड्ड्यावर नियमितपणे येत असल्याची चर्चा असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी या जुगार अड्ड्याची माहिती पोलीस विभागाला मिळाल्यानंतर संबंधित बिअर बारवर धाड टाकण्यात आल्याची चर्चा आहे. काही सूत्रांचा दावा आहे की, ही धाड स्वतः ठाणेदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मात्र, या कारवाईत नेमके काय आढळले, किती जणांवर गुन्हे दाखल झाले किंवा कोणती जप्ती करण्यात आली, याबाबत पोलीस विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर धाड टाकण्यात आली होती, तर त्याची अधिकृत माहिती का देण्यात आली नाही? संबंधितांवर कारवाई झाली का? की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला? अशा चर्चांना शहरात उधाण आले आहे.
बिअर बारच्या नावाखाली जर जुगाराचा व्यवसाय सुरू असेल, तर तो कायद्याचे उघड उल्लंघन असून अशा बेकायदेशीर प्रकारांना कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलिसांची या प्रकाराकडे मूकसंमती आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच धाडीसंदर्भातील संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(टीप : वरील वृत्तातील काही बाबी या स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व चर्चेच्या आधारे मांडण्यात आल्या आहेत. संबंधित बिअर बार, पोलीस विभाग किंवा इतर संबंधित पक्षांचे अधिकृत म्हणणे उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here