*परिचारिका अरुणा गुरुनुले फ्लोरेन नाईटिंगल पुरस्काराने सन्मानीत*
जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला
*अरुणा गुरुनुले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव*
*वणी:*- येथील ग्रामीण रुग्णालयातील वरिष्ठ अधिपरिचारिका अरुणा नारायणराव गुरुनुले यांचे नुकतेच यवतमाळ येथे जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे फ्लोरेन नाईटिंगल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
फ्लोरेन नाइटिंगल यांचे 12 मे हे जन्मदिवस असून त्या दिवशी परिचारिका दिन म्हणून साजरा केले जाते. परिचारिका दिनाचे औचित्य साधून यंदाचे जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार अरुणा गुरुनुले यांना प्राप्त झाले.
अरुणा गुरुनुले हे मागील अनेक वर्षांपासून वणी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असून या आधी दिग्रस, मारेगाव येथे सेवा दिली आहे. अरुणा गुरुनुले यांच्या सेवाभावी, उत्कृष आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे फ्लोरेन नाईटिंगल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि गुरुवार 18 जून रोजी यवतमाळ येथील जिल्हापरिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते शिल्ड, प्रमाणपत्र देऊन अरुणा गुरनुले यांना सन्मानीत करण्यात आले.
अरुणा गुरुनुले ह्या अत्यंत कठीण व प्रतिकूल परिस्थितीला मात करून मेहनतीच्या जोरावर आरोग्य विभागात शासकीय सेवा प्राप्त केले असून गोरगरिबांची जाण ठेऊन त्या प्रत्येक रुग्णांसोबत सौहार्दाने व जिव्हाळ्याने वागतात व आस्थेने आरोग्य सेवा पुरवितात.
विशेष म्हणजे कोरोना काळातही अरुणा गुरुनुले यांनी जीवाची पर्वा न करता उत्तम व उत्कृष्ट सेवा बजाविली होती. एकंदरीत त्यांच्या निःस्वार्थ व सेवाभावी, प्रामाणिक कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय फ्लोरेन नाईटिंगल पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.



















