कतलीच्या उद्देशाने होणारी ३४ गोवंशीय बैलांची आंतरराज्यीय तस्करी उधळली; ५ वाहनांसह ४३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

कतलीच्या उद्देशाने होणारी ३४ गोवंशीय बैलांची आंतरराज्यीय तस्करी उधळली; ५ वाहनांसह ४३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वणी | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कतलीच्या उद्देशाने तेलंगणा राज्यात नेण्यात येणाऱ्या ३४ गोवंशीय बैलांची आंतरराज्यीय तस्करी उधळून लावली. या कारवाईत ५ वाहने, ३४ गोवंशीय बैल असा एकूण ४३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे व गोवंशीय जनावरांची तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. त्याअंतर्गत ६ जुलै रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बाजारातून गोवंशीय बैल पिकअप वाहनांमधून भरून मुकुटबन पोलिस ठाणे हद्दीतील राजूर गोटा मार्गे पैनगंगा नदी ओलांडून तेलंगणा राज्यात कतलीसाठी नेण्यात येणार आहेत.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुटबन पोलिसांच्या मदतीने राजूर गोटा येथे सापळा रचून कारवाई केली. पिकअप वाहनांची तपासणी केली असता अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने बांधून ठेवलेले ३४ गोवंशीय बैल आढळून आले.

कारवाईदरम्यान पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून MH-34-BZ-6139, MH-40-Y-0229, MH-32-AJ-1382, MH-34-BZ-0767 तसेच एक विना क्रमांकाचे अशोक लेलँड वाहन जप्त करण्यात आले. जप्त वाहनांची किंमत सुमारे २६.५० लाख रुपये, तर गोवंशीय जनावरांची किंमत १६.६७ लाख रुपये असून एकूण ४३.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तपासादरम्यान स्थानिक आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नानेश ठाकरे भोयर (रा. राजूर गोटा) याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने इतर साथीदारांच्या सांगण्यावरून ही जनावरे तेलंगणातील व्यापाऱ्यांकडे कतलीसाठी पोहोचविण्यात येत असल्याचे सांगितले. फरार आरोपींचा शोध सुरू असून जप्त करण्यात आलेल्या सर्व गोवंशीय जनावरांना वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षिततेसाठी वणी तालुक्यातील गोरू गणेश गोशाळा येथे रवाना करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश जाधव तसेच मुकुटबन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, मुकुटबन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, अमित पोयाम तसेच पोलीस कॉन्स्टेबल रजनीकांत मडावी, सतीश फुके आणि बादल जाधव यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.
यशस्वीरित्या पार पाडली.

Latest

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

लाल पुलिया येथे कोळसा वाहतुकीत ई-वे बिलाचा संशयास्पद प्रकार; जीएसटी चोरीची शक्यता?

कोळसा वाहतुकीदरम्यान ई-वे बिलाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर...
spot_imgspot_img

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता चार लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात २० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये...

पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता चार लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात २० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये धडक कारवाई पुसद...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here