*आयफोनच्या हट्टापायी आजोबांचे घरच फोडले!* *‘स्टेटस’च्या नादात ६.७२ लाखांचे सोने लंपास; बदलत्या मानसिकतेचा धक्कादायक चेहरा*

*आयफोनच्या हट्टापायी आजोबांचे घरच फोडले!*

*‘स्टेटस’च्या नादात ६.७२ लाखांचे सोने लंपास; बदलत्या मानसिकतेचा धक्कादायक चेहरा*

वणी- आबीद हुसेन

महागडा मोबाईल फोन घेण्याची इच्छा आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी… बदलत्या काळातील तरुणाईच्या मानसिकतेचा धक्कादायक प्रकार वणी येथे समोर आला आहे. आयफोन १६ प्रो खरेदी करण्याच्या हट्टापायी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने चक्क आपल्या आजोबांच्या घरातील कपाट फोडून तब्बल ६ लाख ७२ हजार रुपयांचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा वणी पोलिसांनी उलगडा केला असून, चोरीतील सर्व सोने जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनकवाडी येथील बंडू विठोबा बोठाले यांच्या घरी २० ते २१ ऑगस्टच्या रात्री घरफोडी झाली होती. लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. आयफोन १६ प्रो खरेदी करण्याची इच्छा असल्याने संबंधित बालकाने आपल्या मित्रांकडे याबाबत चर्चा केली होती. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी त्याला चोरीस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बालकाने स्वतःच्या आजोबांच्या घरातील कपाटाची चावी वापरून दागिने काढल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकासह गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव याला ताब्यात घेतले. चोरीचे सोने विकण्यासाठी चंद्रपूर किंवा नागपूरकडे जाण्याच्या तयारीत असताना दोघांना पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्यांच्याकडून २५ ग्रॅमचा सोन्याचा हार, विविध प्रकारचे गोप आणि कानातील टॉप्स असा एकूण ५२ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दागिन्यांची किंमत ६ लाख ७२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपी सुरज हुसैन गेडाम याचा शोध सुरू आहे.

*हट्ट की वाढती विकृती?*

महागडा मोबाईल, ब्रँडेड वस्तू आणि समाजमाध्यमांवरील दिखावा… या स्पर्धेत तरुणाईचा एक वर्ग भरकटत तर नाही ना, असा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे. इच्छा असणे चुकीचे नाही; मात्र ती पूर्ण करण्यासाठी आपल्याच कुटुंबीयांचा विश्वास तोडून चोरीचा मार्ग निवडणे, ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

पालकांनी मुलांच्या गरजा आणि त्यांच्या वाढत्या अपेक्षा समजून घेण्यासोबतच, महागड्या वस्तूंच्या मोहापेक्षा संस्कार आणि योग्य मूल्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे आणि ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी प्रमुख सय्यद साजिद आदी वणी पोलिसांच्या पथकाने केली.

Latest

Newsletter

spot_img

Don't miss

स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने दिली जोरदार धड

स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या...
spot_imgspot_img

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का?

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का? मध्यप्रदेशातून मद्यपुरवठा होत असल्याची माहिती; तीन कथित...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा!

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा! वणी | प्रतिनिधी वणी शहरातील...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य सूत्रधार कोण?...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here