स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने दिली जोरदार धड

स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने दिली जोरदार धड

वणी :प्रतिनिधी

मारेगाव येथे स्कूल बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास घडली. रमेश दादाराव मेश्राम (वय 26, रा. डोंगरगाव, ता. मारगाव, जि. यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश मेश्राम हे मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रमेश हा 1 ऑक्टोबर रोजी काम आटोपून मोटारसायकलने मारगावकडे जात होता. मार्डी चौक ते सरकारी दवाखाना मार्गावरील श्रीराम किराणा दुकानासमोर त्याच्या मोटारसायकलला पिवळ्या रंगाच्या स्कूल बस क्रमांक MH29BE1274 च्या चालकाने धडक दिली. या अपघातात रमेशच्या चेहऱ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्याला तातडीने सरकारी दवाखाना, मारगाव येथे दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणी येथील सुगम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

या प्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारगाव पोलिसांनी स्कूल बस चालकाविरुद्ध BNS कलम 281, 106(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Latest

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का?

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का? मध्यप्रदेशातून मद्यपुरवठा होत असल्याची माहिती; तीन कथित...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा!

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा! वणी | प्रतिनिधी वणी शहरातील...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य सूत्रधार कोण?...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here