वणी पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून मालकांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

तांत्रिक तपासाच्या बळावर मौल्यवान मोबाईल परत; नागरिकांकडून वणी पोलिसांच्या कार्याचे कौतुक

वणी | प्रतिनिधी

हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळणे म्हणजे अनेकांसाठी जवळपास अशक्य वाटणारी गोष्ट. मात्र, वणी पोलिसांनी तांत्रिक तपास, आधुनिक प्रणाली आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांच्या स्वाधीन करत पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची प्रचिती दिली आहे.

वणी पोलिसांनी विविध ठिकाणी हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढत गजानन नारायण कुलीजवार (आयता, ता. आर्णी, जि. यवतमाळ) आणि पंकज श्रीकांत लोहकरे (कनकवाडी, वणी) यांचे मोबाईल शोधून काढले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून हे मोबाईल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

दीर्घ प्रतीक्षेनंतर आपले मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी वणी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. वाढत्या मोबाईल चोरी व हरवण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वणी पोलिसांनी केलेली ही कारवाई नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आणि पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

कायद्याचे पालन आणि नागरिकांच्या सेवेसाठी वणी पोलीस सदैव कटिबद्ध असून, मोबाईल किंवा इतर मौल्यवान वस्तू हरवल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Latest

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

लाल पुलिया येथे कोळसा वाहतुकीत ई-वे बिलाचा संशयास्पद प्रकार; जीएसटी चोरीची शक्यता?

कोळसा वाहतुकीदरम्यान ई-वे बिलाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर...
spot_imgspot_img

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता चार लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात २० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये...

पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता चार लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात २० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये धडक कारवाई पुसद...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here