देशभक्तीपर कराओके गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
वणी : स्वामी समर्थ संगीत संघाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा वणी येथील श्री संताजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी स्पर्धकांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. ‘अ’ गटामध्ये ४५ विद्यार्थ्यांनी, तर ‘ब’ गटामध्ये ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
‘अ’ गटात प्रथम क्रमांक हर्षाली झाडे हिने पटकावला. तिला ३ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. द्वितीय क्रमांक आवेश झाकरकर याला २ हजार रुपये, तर तृतीय क्रमांक राधा कुचनकर हिला १ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षिसे गरिमा शेजाळ व सम्राट तामगाडे यांना देण्यात आली.
‘ब’ गटात प्रथम क्रमांक शर्वरी बाविस्कर हिने मिळवला. तिला ३ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. द्वितीय क्रमांक प्रतिक्षा पेटकर हिला २ हजार रुपये, तर तृतीय क्रमांक द्रुप निखाडे हिला १ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षिसे रिदिमा शेजाळ व तन्वी कावडे यांना देण्यात आली.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी लय तरंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर तबला वादन सादर केले. गिटार वादक सरसम म्युझिकचे हरीश घाटे यांनी उत्कृष्ट गिटारवादन करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
वणी येथील गायक कलाकार व मेलोडी ऑर्केस्ट्राचे स्व. सय्यद बाबू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच महेश जोशी यांनी मेल व फिमेल आवाजात गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमादरम्यान शाळा-श्रीफळ देऊन शैलेश अडपावार सर व पवार सर यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरणाची व्यवस्था केल्याबद्दल स्वामी समर्थ संगीत संघाचे शैलेश अडपावार सर यांचाही शाळा-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश अडपावार सर, डिंपल सोनकांबळे मॅडम, अंजनी गाडेकर, शफी खान, संजय शिरभाते, अशपाक सय्यद, अमोल बावणे, प्रियंका कोनप्रितवार, रफिक शेख, रंजना भंडारवार, तृप्ती माळीकर, पुनम बावणे, अंजली गिरटकर, शीतल पारधी, विद्या कटाणे व सुनीता गालोवार यांनी अथक परिश्रम घेतले.



















