वणीत बिअर बारच्या आड सुरू ‘जुगाराचा अड्डा’? लाखोंची उलाढाल, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जुगार सुरू असल्याचा दावा; धाड पडल्याची चर्चा, मात्र कारवाईबाबत अद्याप मौन

वणीत बिअर बारच्या आड सुरू ‘जुगाराचा अड्डा’? लाखोंची उलाढाल, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जुगार सुरू असल्याचा दावा; धाड पडल्याची चर्चा, मात्र कारवाईबाबत अद्याप मौन
वणी | प्रतिनिधी
वणी शहरातील एका बिअर बारमध्ये खुलेआम जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गंभीर चर्चा शहरात रंगली असून, या ठिकाणी दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा दावा स्थानिक सूत्रांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तीदेखील या जुगार अड्ड्यावर नियमितपणे येत असल्याची चर्चा असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी या जुगार अड्ड्याची माहिती पोलीस विभागाला मिळाल्यानंतर संबंधित बिअर बारवर धाड टाकण्यात आल्याची चर्चा आहे. काही सूत्रांचा दावा आहे की, ही धाड स्वतः ठाणेदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मात्र, या कारवाईत नेमके काय आढळले, किती जणांवर गुन्हे दाखल झाले किंवा कोणती जप्ती करण्यात आली, याबाबत पोलीस विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर धाड टाकण्यात आली होती, तर त्याची अधिकृत माहिती का देण्यात आली नाही? संबंधितांवर कारवाई झाली का? की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला? अशा चर्चांना शहरात उधाण आले आहे.
बिअर बारच्या नावाखाली जर जुगाराचा व्यवसाय सुरू असेल, तर तो कायद्याचे उघड उल्लंघन असून अशा बेकायदेशीर प्रकारांना कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलिसांची या प्रकाराकडे मूकसंमती आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच धाडीसंदर्भातील संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(टीप : वरील वृत्तातील काही बाबी या स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व चर्चेच्या आधारे मांडण्यात आल्या आहेत. संबंधित बिअर बार, पोलीस विभाग किंवा इतर संबंधित पक्षांचे अधिकृत म्हणणे उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Latest

Newsletter

spot_img

Don't miss

स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने दिली जोरदार धड

स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या...
spot_imgspot_img

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का?

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का? मध्यप्रदेशातून मद्यपुरवठा होत असल्याची माहिती; तीन कथित...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा!

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा! वणी | प्रतिनिधी वणी शहरातील...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य सूत्रधार कोण?...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here