जैन लेआउटमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धाड; लाखोंचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त
यवतमाळ : शहरातील जैन लेआउट परिसरात आज, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धाडसत्र राबविले. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक सध्या घटनास्थळी असून कारवाई सुरू आहे.
जप्त मालाचे नेमके प्रमाण, किंमत तसेच संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबतची अधिकृत माहिती कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
या धाडीत नेमका किती रुपयांचा माल जप्त झाला? कोणावर कारवाई होणार? याकडे आता लक्ष लागले आहे.



















