वणी पोलिसांची दमदार कामगिरी; १ घरफोडी, १ घरफोडीचा प्रयत्न व बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस

वणी पोलिसांची दमदार कामगिरी; १ घरफोडी, १ घरफोडीचा प्रयत्न व बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस

वणी | प्रतिनिधी

वणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत तीन गुन्ह्यांचा छडा लावत एक घरफोडी, एक घरफोडीचा प्रयत्न आणि बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ₹20,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक भानुदास पिडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर घरफोडी व घरफोडीच्या प्रयत्नाचे गुन्हे उघडकीस आले.

या प्रकरणात युनित राजू मानकर (रा. रंगनाथनगर, वणी), राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (रा. रंगनाथनगर, वणी) यांना अटक करण्यात आली. तसेच बॅटरी चोरीच्या प्रकरणात विजय देवानंद मेश्राम (रा. नवीन लालगुडा, वणी) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम व दोन मोठ्या बॅटऱ्या असा एकूण ₹20,900 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिडुरकर यांच्या नेतृत्वात डी.बी. पथक प्रमुख पीएसआय सैयद साजिद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, मारोती पाटील, निलकमल भोसले, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पप्पलवार, मोनेश्वर खंडे, रितेश भैयर, चालक शुभम किशोर, महिला पोलीस अंमलदार चेताली चेंडे व सहकाऱ्यांनी पार पाडली.

विशेष म्हणजे, वणी पोलीस ठाण्याच्या क्राईम व गुन्हे शोध शाखेत पीएसआय सैयद साजिद यांच्या नियुक्तीनंतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या कारवायांना वेग आला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा वाढता धाक निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here