विद्यार्थ्यांच्या जीवाची जबाबदारी कोणाची? अपूर्ण इमारतीत वर्ग सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

विद्यार्थ्यांच्या जीवाची जबाबदारी कोणाची? अपूर्ण इमारतीत वर्ग सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

वणी : मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी, गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरातील अपूर्ण इमारतीचा मुद्दा आता अधिक गंभीर बनला आहे. बांधकाम पूर्ण झालेले नसताना विद्यार्थ्यांना याच इमारतीत बसवून शिक्षण दिले जात असल्याचा आरोप असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत.

इमारतीच्या काही भागात अद्याप बांधकाम सुरू आहे. खिडक्यांचे काम अपूर्ण असल्याचे दिसून येते, तर लिफ्टसाठी ठेवण्यात आलेला भाग उघडा असल्याची बाबही निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत शाळेत येणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? हा प्रश्न आता पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का प्रशासन?

एखादा विद्यार्थी उघड्या भागाजवळ गेला, पाय घसरला किंवा बांधकामातील साहित्यामुळे दुर्घटना घडली, तर त्यानंतर प्रशासन जागे होणार का? दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा त्यापूर्वीच सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक नाही का?

जर संबंधित इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक परवानगी नसल्याचे नगरपालिका अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असेल, तर एवढ्या मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना कारवाई का झाली नाही? आणि जर परवानगी असेल तर ती कोणत्या नियमांनुसार देण्यात आली, याचा खुलासा वणी नगरपालिकेने करावा.

कम्प्लिशन सर्टिफिकेट नसताना शाळा कशी सुरू?

सदर इमारतीला अद्याप कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेले नसल्याची माहिती आहे. मग बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नसताना विद्यार्थ्यांना या इमारतीत बसविण्याची परवानगी कोणी दिली? शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता तपासली आहे का? शिक्षण विभागाने इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे का?

हे प्रश्न आता केवळ चर्चेपुरते न राहता प्रशासनाने अधिकृतपणे स्पष्ट करणे गरजेचे आहे.

पालकही गप्प; उद्या दुर्घटना झाली तर?

सर्वात चिंतेची बाब म्हणजे आपल्या मुलांना या शाळेत पाठविणाऱ्या पालकांना परिस्थितीची माहिती असूनही मोठ्या प्रमाणात आवाज उठताना दिसत नाही. मात्र, दुर्घटना घडल्यानंतर पश्चात्ताप करून उपयोग काय?

उद्या एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याला इजा झाली किंवा त्याहून मोठी दुर्घटना घडली तर जबाबदारी कोण स्वीकारणार—शाळा व्यवस्थापन, बांधकाम करणारे संबंधित किंवा वणी नगरपालिका प्रशासन?

नगरपालिकेने कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी करावी

बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली असेल तर त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई काय झाली, याचाही खुलासा नगरपालिकेने करावा. केवळ नोटीस काढून फाईल बंद करण्याची पद्धत असेल तर ती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

वणी नगरपालिका आणि शिक्षण विभागाने संयुक्तपणे बांधकामाची परवानगी, बांधकाम नकाशा, सुरक्षा मानके, अग्निसुरक्षा, लिफ्टची सुरक्षितता आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट यांची तातडीने तपासणी करावी.

विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे; त्यामुळे “दुर्घटना झाल्यावर कारवाई” नव्हे, तर “दुर्घटना होण्यापूर्वी कारवाई” हवी!

Latest

Newsletter

spot_img

Don't miss

स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने दिली जोरदार धड

स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या...
spot_imgspot_img

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का?

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग ३! गोडाऊनवर ‘बालाजी इंडस्ट्रीज’चा फलक, सीसीटीव्ही फुटेज कुठे? चौकीदारावरच कारवाई करून तपास थांबणार का? मध्यप्रदेशातून मद्यपुरवठा होत असल्याची माहिती; तीन कथित...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा!

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणाचा भाग २! मध्यप्रदेशातून मद्याचा पुरवठा? ‘सुपरवायझर’ कोण, कुलदीप जयस्वाल यांची भूमिका काय? सात लाखांच्या ‘सेटिंग’ची दुसऱ्या दिवशीही चर्चा! वणी | प्रतिनिधी वणी शहरातील...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य...

वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा! १५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य सूत्रधार कोण?...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here