काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३, प्लॉट क्र. ०१ वरील इमारतीमध्ये परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आबिद हुसेन जाहिद हुसेन यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी वणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करून तातडीने चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सदर इमारतीस नगरपरिषदेकडून पूर्वी निवासी वापरासाठी बांधकामाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सध्या या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराने इमारतीबाबत विविध गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. सदर इमारतीला अद्याप नगरपरिषदेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी/वापर प्रमाणपत्र) देण्यात आलेले नसल्याची माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निवासी वापरासाठी परवानगी असताना व्यावसायिक स्वरूपाचे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक वापरबदलाची परवानगी घेतल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, रुग्णालयासाठी आवश्यक पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याचे, तसेच इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आली असली तरी संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेतल्याची माहिती उपलब्ध नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या सर्व बाबी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, विकास नियंत्रण नियमावली तसेच नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीतील अटींचे उल्लंघन ठरू शकतात, असा दावा तक्रारदाराने केला आहे.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने सदर इमारतीची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम व वापरासंदर्भातील सर्व परवानग्यांची पडताळणी करावी. नियमबाह्य बांधकाम, अनधिकृत वापर अथवा परवानगीशिवाय सुरू असलेले काम आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास अनधिकृत बांधकामावर पाडकामाची कारवाई करावी, अशी मागणी आबिद हुसेन यांनी केली आहे.

दरम्यान, या तक्रारीवर नगरपरिषद प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

लाल पुलिया येथे कोळसा वाहतुकीत ई-वे बिलाचा संशयास्पद प्रकार; जीएसटी चोरीची शक्यता?

कोळसा वाहतुकीदरम्यान ई-वे बिलाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर...
spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता चार लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात २० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये...

पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता चार लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात २० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये धडक कारवाई पुसद...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here