वणी पोलिसांची मोठी कारवाई; चोरी गेलेला १२ चाकी टाटा हायवा ट्रक जप्त, २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वणी पोलिसांची मोठी कारवाई; चोरी गेलेला १२ चाकी टाटा हायवा ट्रक जप्त, २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वणी | प्रतिनिधी

वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेला तब्बल २५ लाख रुपये किमतीचा १२ चाकी टाटा हायवा ट्रक वणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत लातूर येथून जप्त केला आहे. या प्रकरणात चार संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीचा टाटा हायवा ट्रक क्रमांक C.G.04 N.V.1481 हा लालपुलिया, वणी येथे उभा करण्यात आला होता. १ जून २०२६ रोजी अज्ञात चोरट्याने ट्रक चोरून नेला. याबाबत फिर्यादी हर्षल रमेश लोहकळे, रा. वणी यांनी २ जुलै रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक 345/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज, टोलनाक्यावरील फुटेज तसेच मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण करून चोरट्यांचा माग काढला. तपासादरम्यान चंद्रपूर व नागपूर परिसरात शोध घेतल्यानंतर चोरीचा ट्रक लातूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी लातूर येथे स्वतंत्र पथक पाठवून बायपास रोडवरील पार्किंग यार्डची पाहणी केली. यावेळी चोरीचा हायवा ट्रक बनावट क्रमांक TS.29 TV.8676 लावून पार्किंगमध्ये उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात अजय चंद्रमान केसकर (३५), रा. माजरी, जि. चंद्रपूर; राजू ऊर्फ जयप्रकाश गायाप्रसाद केसकर (४७), रा. राजूर कॉलरी, जि. यवतमाळ; हिरालाल बाबूलाल कश्यप (४१), रा. कनहान, जि. नागपूर आणि रविशंकर जगदीश प्रसाद (४०), रा. कामठी कॉलनी क्र. ४, जि. नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वणीचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात डि.बी. पथक प्रमुख पोउपनि साजीद सैय्यद, पोहेकाँ गजानन सावसाकडे, पोलीस अंमलदार मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पुप्पलवार, गणेश मेश्राम, रितेश भोयर यांनी यशस्वीरित्या कार्यवाही पार पाडली.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

लाल पुलिया येथे कोळसा वाहतुकीत ई-वे बिलाचा संशयास्पद प्रकार; जीएसटी चोरीची शक्यता?

कोळसा वाहतुकीदरम्यान ई-वे बिलाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर...
spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here