मोठ्यांना अभय… गरिबांवर कारवाई! वणी नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर संताप; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मोठ्यांना अभय… गरिबांवर कारवाई!

वणी नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर संताप; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

वणी | प्रतिनिधी

वणी नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम ही खरंच शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आहे की केवळ दिखाव्यासाठी? हा प्रश्न आता वणीकर उघडपणे विचारू लागले आहेत. कारण शहरातील अनेक मोठी अतिक्रमणे आजही राजरोसपणे उभी असताना, गरीब हातगाडीधारक, छोटे दुकानदार आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवरच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नगरपरिषदेसमोरील अतिक्रमणे, कॉम्प्लेक्ससमोरील शेड, ज्योतिबार गल्ली, गांधी चौक, दीपक चौपाटीसह अनेक भागांतील अतिक्रमणे कायम असताना, प्रशासनाची नजर त्यांच्याकडे का जात नाही? हा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

याहून गंभीर बाब म्हणजे शहरात अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे सुरू असल्याची चर्चा आहे. एका शिक्षण संस्थेच्या कथित विनापरवानगी चार मजली बांधकामाबाबत तक्रारी झाल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप होत आहे. मग नियम फक्त गरीबांसाठीच आहेत का? प्रभावशाली लोकांसाठी वेगळे कायदे आहेत का? असे संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

अतिक्रमण हटाव मोहिमेत “तोंड पाहून कारवाई” होत असल्याची भावना शहरात वाढत आहे. प्रभावशाली अतिक्रमणधारकांवर कारवाई टाळली जाते, तर गरीबांचे संसार उद्ध्वस्त केले जातात, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात अशीही चर्चा आहे की, काही मोठ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई टाळली जाते. या चर्चेची सत्यता प्रशासनाने पारदर्शक कारवाई करून स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान, सत्ताधारी गटातील काही पदाधिकाऱ्यांनीही मुख्याधिकाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण नसल्याचे मान्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे नगरपरिषदेचा कारभार नेमका कोणाच्या प्रभावाखाली चालतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता वणीकरांचा थेट सवाल आहे—

मोठ्यांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का?

अतिक्रमण हटाव मोहिमेत एकच न्याय लागू होणार का?

सामान्य जनतेशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार का?

विनापरवानगी बांधकामांवर हात घालण्याची तयारी मुख्याधिकारी दाखवणार का?

आता या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी करून अतिक्रमण हटाव मोहिमेतील कथित दुजाभाव, निवडक कारवाई आणि नागरिकांशी वर्तन याची सखोल तपासणी करावी, अशी जोरदार मागणी वणीकरांकडून होत आहे. प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम लागू करूनच आपली विश्वासार्हता सिद्ध करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. :::**

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here