नेग वसुलीच्या वादावरून वणीत किन्नरांचे दोन गट भिडले; पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

नेग वसुलीच्या वादावरून वणीत किन्नरांचे दोन गट भिडले; पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला
वणी | प्रतिनिधी
वणी शहरात नेग वसुलीच्या अधिकारावरून किन्नरांच्या दोन गटांमध्ये निर्माण झालेला वाद मंगळवारी चांगलाच चिघळला. दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची, धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होताच दोन्ही गट वणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दोन्ही पक्षांची समजूत काढत सुमारे दोन तास चर्चा केली. अखेर दोन्ही गटांनी लेखी समझोता करून भविष्यात शांतता राखण्याचे मान्य केल्याने प्रकरणावर पडदा पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील किन्नर गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरात विवाह, मुलगा-मुलगी जन्म, गृहप्रवेश तसेच इतर मांगलिक प्रसंगी नेग वसुलीचे काम करत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अमरावती व यवतमाळ येथील दुसरा किन्नर गटही वणी शहरात नेग वसुली करू लागल्याने वरोरा गटाच्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला.
यासंदर्भात वरोरा गटाने अनेक वेळा आपसात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वणी शहरात चांगले उत्पन्न मिळत असल्याने दुसरा गट शहर सोडण्यास तयार नव्हता. याच कारणावरून मंगळवारी दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.
घटनेनंतर दोन्ही गट वणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांना आपल्या दालनात बोलावून सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समुपदेशनानंतर दोन्ही गटांनी शहरात शांतता राखण्याचे तसेच एकमेकांच्या नेग वसुलीच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या घटनेची माहिती शहरभर पसरताच पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली. संपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी अनेकांनी पोलीस ठाण्याबाहेर उपस्थिती लावली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणताही किन्नर अथवा इतर व्यक्ती जबरदस्तीने नेग किंवा पैशांची मागणी करत असल्यास किंवा दबाव टाकून वसुलीचा प्रयत्न करत असल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करावी. अशा प्रकरणांमध्ये जबरदस्तीची वसुली आणि संबंधित कायदेशीर कलमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here