लॉबिंग करणाऱ्यांना धक्का; जयकुमार आबड यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ

लॉबिंग करणाऱ्यांना धक्का; जयकुमार आबड यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ

अभिनंदनाचा वर्षाव; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, युवा ताकदीला काँग्रेसची संधी

वणी | प्रतिनिधी

वणी शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आणि विविध इच्छुकांच्या लॉबिंगला पूर्णविराम मिळाला आहे. अनेक नावांची चर्चा रंगत असताना काँग्रेस पक्षाने ऐनवेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत वसंत जिनिंगचे उपाध्यक्ष जयकुमार आबड यांची वणी शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाने युवा नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासाचे स्वागत होत आहे.

शहराध्यक्षपदासाठी राजू अंकतवार, भास्कर गोरे आणि काँग्रेस सेवा दलाचे रवी कोटावार यांनी वरिष्ठांकडे अर्ज सादर करून जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. विविध गटांकडून आपल्या उमेदवारासाठी लॉबिंग सुरू असल्याने या निवडीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे शेवटच्या क्षणी सर्व चर्चांना छेद देत पक्षश्रेष्ठींनी जयकुमार आबड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

जयकुमार आबड यांच्या निवडीची घोषणा होताच शहरभर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सामाजिक माध्यमांवरही शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.

विशेष म्हणजे, जय आबड हे युवकांमध्ये लोकप्रिय चेहरा मानले जात असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे युवा ताकदीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

या नियुक्तीमुळे वणी शहर काँग्रेसमध्ये नव्या उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, संघटना बळकट करण्यासाठी जयकुमार आबड यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here