नाजिया इलाही खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात वणी पोलिसांत तक्रार AIMIM वणी शहराध्यक्ष आसिम हुसेन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

नाजिया इलाही खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात वणी पोलिसांत तक्रार

AIMIM वणी शहराध्यक्ष आसिम हुसेन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

वणी | प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत बीबी आयशा (र.अ.) यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत नाजिया इलाही खान यांच्याविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार AIMIM वणी शहराध्यक्ष आसिम हुसेन यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

निवेदनानुसार, विविध माध्यमे व सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आसिम हुसेन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित महिला वारंवार अशा प्रकारची आक्षेपार्ह विधाने करत असल्याचा आरोप असून, यामुळे समाजात द्वेष आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहितेतील (BNS) लागू असलेल्या कलमान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच भविष्यात कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांबाबत किंवा धार्मिक व्यक्तिमत्त्वांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये होऊ नयेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here