लक्झरी हॅरिअर कारमधून विदेशी दारूची तस्करी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त कार व ॲक्टिव्हासह तिघांना अटक; वणी पोलिसांची धडक कारवाई

लक्झरी हॅरिअर कारमधून विदेशी दारूची तस्करी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

कार व ॲक्टिव्हासह तिघांना अटक; वणी पोलिसांची धडक कारवा

वणी | प्रतिनिधी

अवैध विदेशी मद्य तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत वणी पोलिसांनी मोठी कारवाई करत लक्झरी हॅरिअर कारमधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याच परिसरात ॲक्टिव्हा दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आणखी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन्ही कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत्रा रोड परिसरातील मंजुषा बारजवळ अवैधरीत्या विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली.

यावेळी एमएच ४२ बीई ९३९५ क्रमांकाच्या हॅरिअर कारची झडती घेतली असता, कारमध्ये २७ हजार ७३० रुपयांची विविध ब्रँडची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी सुमारे १९ लाख रुपये किमतीची हॅरिअर कार आणि दारूसह मुद्देमाल जप्त केला. तसेच चालक भारत प्रमोद टोंगे (रा. शिंदोला) याला अटक करण्यात आली.

यानंतर त्याच परिसरात करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत ॲक्टिव्हा दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अडविण्यात आले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ६ हजार २४० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी सुमित झुंगे (वय १९)शुभम वाघमारे यांना अटक करून दारू व दुचाकी जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दलवे आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद, पोहेकॉ गजानन सावसाकडे, मारोती पाटील, पुरुषोत्तम दडमल, रितेश भोयर, मोनेश्वर खांडे, नंदकुमार पुप्पलवार, माधव दहीकांबळे आणि गजानन कुलमेथे यांनी पार पाडली.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here